शोपियनमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलिस ठार 

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. साकिब अहमद मीर असे मरण पावलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून ते शोपियनमधील एका पोलिस ठाण्याबाहेर चौकीदार होते. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये ते जखमी झाले आणि रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
जम्मू काश्‍मीरमध्ये आगामी काळात होणाऱ्या पंचायतींच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने दोन आठवड्यांपूर्वीच तीन पोलिसांचे अपहरण आणि हत्या केली होती. त्यापैकी दोघेजण स्पेशल पोलिस ऑफिसर होते. गुरुवारी दहशतवाद्यांच्या चार स्वतंत्र हल्ल्यांमध्ये सहा जण मारले गेले होते. त्यामध्ये दोन सामान्य नागरिक आणि दोन अज्ञात व्यक्‍तींचाही समावेश होता. जम्मू काश्‍मीरमध्ये ऑक्‍टोबर ते डिसेंबरदरम्यान पंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवादी गट आणि विभाजनवादी संघटनांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)