शॉर्ट फिल्म कॉर्नर : सम स्केअर्स आर वर्थ इट 

आपल्याकडे जवळपास एका मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू होतो. त्यातील केवळ १०० जणांचेच अवयव दान केले जातात किंवा होतही नाहीत. अवयव न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात आज ५ लाखांच्या वर आहे. अवयवदानाबाबत फारच थोड्या लोकांना माहिती असते. याबाबद्दल सरकार जनजागृती करत असूनही अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याच संदर्भातील एक छोटीशी शॉर्ट फिल्म… 

या लघु कथेची सुरुवात एका हॉस्पिटलपासून होते.डॉक्टर एका महिलेला तिच्या पतीच्या किडनीच्या आजराबद्दल माहिती देत असतात. डॉक्टर त्या महिलेला किडनी ट्रान्सप्लांटविषयी सांगतात. परंतु, त्यांच्याकडे किडनी उपलब्ध नसल्याचेही सांगतात. यामुळे ती महिला आपल्या पतीला किडनी देण्याची इच्छा दर्शविते. मात्र, तिचे वजन जास्त असल्याने तुमची किडनी चालणार नसल्याचे डॉक्टर सांगतात. यावेळी ती महिला वजन कमी करण्याचा निर्धार करते. व बाजारातून एक वॉल्किंग मशीन आणते. व वेट लूज करण्यास सुरुवात करते. घराचे काम, मुलांना सांभाळत ती आपल्या वजन कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. यावेळी काही लोक तिला हसतात, टोमणे मारतात. पण सर्वांकडे दुर्लक्ष करत ती आपले वजन नऊ ते दहा किलो कमी करते.

वजन कमी झाल्यावर महिला व तिचा नवरा दोघेही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतात. व तिची किडनी तिच्या नवऱ्याच्या शरीरात बसविण्यात येते. याबद्दलची माहिती तिच्या मुलांना त्यांची आजी सांगते. व मुले आईकडे अतिशय गर्वाने बघतात. ही कथा तमिळनाडूमधील एका सत्य घटनेवर आधारित आहे.

सद्याच्या काळात नागरिक अवयव दानासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. परंतु हे प्रमाण अवयवाची गरज असणाऱ्या पेक्षाफारच कमी आहे. एका मृत व्यक्तीचे अवयव तीन ते चार जणांचे जीव वाचवू शकतात. त्यामुळेच आपल्या परिजनांना अवयवाच्या रूपाने जिवंत ठेवून रुग्णांचे प्राण वाचवू या.
Donate Organ, Save Life….

You tube link – https://youtu.be/nbmukab0KiU 

– श्वेता शिगवण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)