शॉर्ट फिल्म कॉर्नर : कपडे नही सोच बदलो

आज कोणतीही मुलगी फॅशनेबल कपडे घालत असली की समाजाची तिच्यावर वक्रदृष्टी पडते. तिच्यावर कमेंट पास केली जाते. छेडछाडीलाही सामोरे जावे लागते. यातही समाज त्या मुलीलाच दोष देतो. तिने तोकडे कपडे घातले म्हणून तिच्यासोबत हा प्रकार घडला. परंतु, फॅशनेबल किंवा तोकडे कपडे घालणे म्हणजे समोरच्याला आमंत्रण देणे असते का? अशाच प्रश्‍नावरील लघुपट आज आपण पाहणार आहोत.

लघुपटाची सुरुवात वरुण आणि पृथ्वी मित्रांपासून होते. दोन्ही मित्र एका बागेत गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यात तिथे एक मुलगी फोनवर बोलत येते. पृथ्वी त्या मुलीला पाहून कमेंट पास करण्यास सुरुवात करतो. यावेळी वरुण त्याला वारंवार थांबविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, पृथ्वी त्याचे ऐकत नाही. व त्या मुलीला छेडत राहतो. हे पाहून ती मुलगी तिथून थोडी लांब निघून जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरुण पृथ्वीला ‘तू त्या मुलीला का छेडले’ असे विचारतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, तिने जीन्स घातली आहे आणि सिव्हलेस टॉप घातला आहे. कशासाठी? आमंत्रण आहे हे माझ्यासाठी. हे ऐकून वरुण पृथ्वीला त्या मुलीजवळ नेतो. व पृथ्वीने तुमच्या कपड्यांमुळे छेड काढली असे सांगतो. वरुण पुढे म्हणतो, यानुसार तू पृथ्वीची जास्त छेड काढायला पाहिजे. त्याने तर केवळ थ्री फॉर्थ आणि बनियानच घातले आहे. वरुण तिला छेड काढण्यासाठी वारंवार विनंती करतो. परंतु, ती मुलगी नकार देते. हे पाहून पृथ्वीला आपल्या चुकीची जाणीव होते व पृथ्वी त्या मुलीची क्षमा मागतो.

कोणत्याही मुलीबद्दल तिच्या कपड्यावरून मत ठरवू नका. तोकडे कपडे घालणे म्हणजे कोणत्याही प्रकारचे आमंत्रण नसते. यासाठी सामाजिक मानसिकता बदलायला हवी.

– श्‍वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)