शॉर्ट फिल्म कॉर्नर : ऑनलाईन प्रेम आणि धोका

आजकाल सर्वच ऑनलाईन झाले आहे. यामधून प्रेम ही निरागस भावनाही सुटू शकलेली नाही. ऑनलाईन डेटिंग हा प्रकार पसरतो आहे. यामध्ये सर्वात जास्त टीनएजर अडकताना दिसतात. चॅटिंगपासून मैत्री ते प्रेम या प्रवासाचा अंत फार भयावह असतो. कधी-कधी ऑनलाईन प्रेमातून अनेक तरुण मुले-मुली आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. आज भारतात लाखोंच्या वर सायबर फ्रॉड होत आहेत. यामधील असंख्य फ्रॉड हे प्रेमाचे किंवा लग्नाचे आमिष दाखवून केले जातात. आज आपण असाच एक लघुपट पाहणार आहोत.

या लघुपटाची सुरुवात एका रोहित नावाच्या मुलापासून होते. सुरुवातीला त्याला एक फोन येतो. यावेळी तो आपल्यासोबत मोठी घटना घडल्याचे सांगतो आणि यानंतर एका आठवड्या आधीचा फ्लॅशबॅक दाखविला जातो. रोहित फेसबुकवर टाईमपास करत असताना त्याला एका लॉरेन नावाच्या अज्ञात मुलीची फ्रेंडरिक्वेस्ट येते. ती तो अॅक्‍सेप्ट करतो. व लॉरेन मेसेज करण्यास सुरुवात करतो. सुरुवातीला औपचारिकरित्या सुरु झालेला संवादाचे नंतर प्रेमात रूपांतर होते. लॉरेन आपण लंडनमध्ये राहत असल्याचे रोहितला सांगते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक दिवस अचानक लॉरेन रोहितला म्हणते, मी तुझ्यासाठी गिफ्ट घेतले आहे. ते मी तुला कुरियरने पाठवेल. हा मेसेज वाचून तो आनंदित होतो. तेवढ्यात त्याचा एक मित्र एवढा का खुश आहेस म्हणून विचारतो. रोहित म्हणतो, नवीन ऑनलाईन वहिनी मिळाली आहे. जी माझ्यासाठी फोन, जीन्स, शर्टस घेत आहे. आता इथून थेट लंडनला जाणार आहे आणि युकेचा जावई बनून राहणार आहे. आता माझी लाईफ सेट झाली आहे.

दोन दिवसांनी रोहितला मुंबई एअरपोर्टवरून एका मुलीचा कॉल येतो. ती रोहितला म्हणते, सर लंडनवरून तुमचे एक पार्सल आले आहे. परंतु, त्याची कस्टम ड्युटी भरलेली नाही. कृपया या पार्सलची कस्टम ड्युटी म्हणून भरावी, असे म्हणून ती रोहितला एका बॅंक खात्याचा नंबर देते. रोहितने त्या बॅंक खात्यावर पैसे जमा केल्यावर पुन्हा मुंबई एअरपोर्टवर कॉल लावतो. तेव्हा तो नंबर अस्तित्वातच नसल्याचे सांगण्यात येते. तो तातडीने घरी जाऊन फेसबुकवर लॉरेनचे अकाउंट चेक करतो. मात्र तेही डिअॅक्‍टिव्हेट केलेले असते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे रोहितच्या लक्षात येते. आज अनेक तरुणांची ऑनलाईन डेटिंगमधून फसवणूक होत आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या व्यक्तीला आपण कधी पहिले नाही अशा व्यक्तीच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करू नका.

– श्‍वेता शिगवण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)