शॉर्टसर्किटमुळे पोंदवडीत गॅस टॅंकर खाक

उसाच्या ट्रेलरला धडक : चालक जखमी

डिकसळ- पुणे- सोलापूर महामार्गावर पोंदवडी गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या उसाच्या ट्रेलरला भारतगॅस कंपनीच्या रिकाम्या टॅंकरने पाठीमागून जोरदार ठोकर दिली. या धडकेत शॉर्टसर्किट झाल्याने अचानक पेट घेतल्याने टॅंकर जळून खाक झाला. या अपघातात टॅंकरचालक जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि,2) रात्री दहाच्या सुमारास घडली. हा टॅंकर रिकामा असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसदेव (ता. इंदापूर) येथून ऊस घेवून ट्रॅक्‍टर (एम. एच. 16 ए एम 9588) अंबालिका कारखान्याकडे निघाला होता. त्यावेळी महामार्गावर भारतगॅस कंपनीचा टॅंकर (केए. 01 एजी 9941) ने ट्रॅक्‍टरला पाठीमागून जोरदार ठोकर दिली. अपघात झाल्यानंतर गॅस टॅंकरने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. या आगीत टॅंकर जळून खाक झाला. त्यामुळे चालकांसह प्रवासी आणि परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भिगवण पोलिसांनी तत्काळ बिल्ट कंपनी, बारामती ऍग्रो, दौंड शुगर्स या कारखान्यातील अग्निशामक दलाला तत्काळ बोलावून आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत चालक रामचंद्र मनोहर काळे (वय 28, रा. पिंपळवंडी, ता. कर्जत जि अहमदनगर) यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये ट्रॅंकरचालक कुमार. बी. बमन (रा. वसंतपरम, जि. नामकल, तामिळनाडू) हा जखमी झाला आहे. भिगवण येथील खासगी रुग्णालयात टॅंकरचालक बमन याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास मोरे अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)