शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस झाला जळून खाक

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी खुर्द येथील शेतकरी डॉ. वीरेश माधव भोसले यांचे दोन एकर उसाचे पीक शॉर्टसर्किट झाल्याने जळून खाक झाले. ही घटना बुधवारी (दि.24) दुपारी घडली.
आश्वी खुर्द शिवारातील भोसलेवस्ती येथील डॉ. वीरेश भोसले यांची गट क्रमांक 123 मध्ये सुमारे पंधरा एकर उसाची शेती आहे. शेतातून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. विजेच्या तारा अनेक ठिकाणी खाली लोंबत आहेत. शेजारीच रोहित्र आहे. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने रोहित्रास आग लागल्याने उसातील पाचटाने पेट घेतला. त्यात तोडणीस आलेला सुमारे दोन एकर ऊस जळून भस्मसात झाला. त्यात भोसले यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
दरम्यान, उसाला आग लागण्याची माहीती गावात पसरताच उमेश सालकर, गणेश भोसले, संजय भोसले, नीलेश भवर, तुषार मांढरे, कृणाल डुबे, सोपान सोनवणे, सतीश सोनवणे, बाळासाहेब भोसले, डॉ. सोपान भोसले, डॉ. लक्ष्मण भोसले, रावसाहेब भोसले, रामराव डुबे, योगेश भोसले, भाऊसाहेब भोसले, अमोल मुन्तोडे आदींनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे इतर पीक वाचले. यावेळी घटनास्थळी विखे पाटील कारखान्याचा अग्निशमन बंबही दाखल झाला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)