शॉटसर्किटमुळे शेतकऱ्याचा ऊस जळाला

बेल्हे-साळवाडी येथे शॉट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज (दि. 24) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साळवाडी येथील सारिका संपत चिंचवडे या शेतकऱ्याचा चार एकर क्षेत्रावरील ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज दुपारनंतर चार वाजण्याच्या सुमारास जोराचा असा वारा सुटल्याने ऊसाच्या पिकामधून विजेच्या तारा गेल्या असल्याने विजेच्या तारा वाऱ्याने हलल्याने तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडून उसाने पेट घेतला, अन्‌ ऊस जळून गेला असल्याचे सांगितले. हा ड्रीपिंगवर असल्याने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)