शॉक लागून महिलेचा मृत्यू

file photo

पिंपरी – पाण्याची मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) पहाटे सहाच्या सुमारास भोसरीतील लांडेवाडी येथे घडली. भाग्यश्री योगेश जाधव (वय-24, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री लांडेवाडी येथे राहतात. मागील चार वर्षांपूर्वी त्यांचा योगेश जाधव यांच्याशी विवाह झाला. आज पहाटे पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)