शैक्षणिक सहलीसाठी अनेक जाचक अटी

मायणी – शैक्षणिक सहलीसाठी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या असल्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन अनेक जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहली आयोजित करताना सहलीच्या परवानगीसाठी शिक्षण उपसंचालक यांना प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, हे प्रस्ताव पाठविले जात असताना शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणेही आवश्‍यक आहे.

याबाबत पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी नियमावली आखून दिली असून, याबाबतचे ऑक्‍टोबर रोजी परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात सहलीसाठी आवश्‍यक कागदपत्रांची यादी नमूद आहे. यंदाच्या वर्षापासून सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विम्याबाबतचे पत्र, तसेच सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र,प्राचार्यांचे शिफारस पत्र, हमीपत्र, सही-शिक्‍क्‍यासह विद्यार्थ्यांची यादी, ठिकाणाबाबतची माहिती, संस्था व्यवस्थापनाचे परवानगी पत्र, बसबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या यादीसह आरटीओ पासिंग परवाना, विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती, पालक व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांच्या रक्तगटाबाबतची माहिती, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आदी जाचक अटी घातल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यासह वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विमा शाळा उतरविणार की पालक हा संभ्रम आहे. शालेय अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. मात्र, सहलीसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याने अडचण निर्माण झाली असून अशा जाचक अटींबाबत शिक्षण विभागाने विचार करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)