शैक्षणिक दाखले पुरात वाहून गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

file photo

थिरूवनंतपुरम – पूरग्रस्त केरळ राज्यातील एका विद्यार्थ्याचे बारावीचे शैक्षणिक दाखले पुरात वाहून गेल्याने त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कैलास असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कोझीकोडे जिल्ह्यातील करंथुर गावचा रहिवासी होता.

तीनच दिवसांपूर्वीचे कुटुंबीय मदत छावणीत राहायला आले आहे. त्याला नुकताच आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला होता. त्यासाठी त्याने नवीन कपडे आणि शैक्षणिक साहित्य अलिकडेच विकत घेतले होते. पण मदत छावणीतून तो जेव्हा घरी आला त्यावेळी त्याला त्याचे हे सारे साहित्य पुराच्या पाण्याने खराब झाल्याचे आढळून आले. त्यात त्याचे बारावीचे सर्टिफिकेटही भिजून खराब झाल्याचे आढळून आल्याने तो निराश होता. त्यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले आहे. केरळातील पुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बेघर झालेल्या 7 लाख 41 हजार लोकांना सरकारी मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)