शैक्षणिक जीवनात कठोर परिश्रमास पर्याय नाही : सागर पाटील

कोपरगाव – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, शैक्षणिक जीवनात शिस्त, कठोर परिश्रम यांना पर्याय नाही, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांनी केले.
जीवनात प्रगती व आनंद यांचा देवदुर्लभ मेळ घालावयाचा असेल तर कलागुणांच्या सादरीकरणास र्पय नाही. त्यासाठी सुरुवात ही बाल्यावस्थेतच हवी. यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते होते.
ईशस्तवनाने सुरू झालेल्या कार्यक्रमात प्रा. खडांगळे यांनी स्वागत तर श्री प्रा.चौधरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विशेष अतिथी निकिता कुऱ्हाडे यांनी ओघवत्या शैलीत स्नेहसंमेलन, मुले व शाळा यांची वैचारिक बैठक विषद केली. श्री गणेश शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विजय शेटे यांनी ग्रामीण भागात संस्थेची स्थापना केल्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवण्याची तळमळ व या संस्थेच्या भविष्यातील नवीन उपक्रमाबद्दल भावना तळमळीने मांडल्या.
दंडवते यांनी शालेय जीवन पाल्याच्या जडणघडणीत किती महत्त्वाची भूमिका बजावते हे विषद केले. लहानपणचा वक्‍तशीरपणा व वैविध्यपूर्ण कार्यक्रमात सहभाग स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यास मोलाचा ठरला, असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात स्पर्धा परिक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री गणेश शैक्षणिक संकुलास नरेश राउत फौंडेशन यांचा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कामिनी विजय शेटे व सचिव प्रा. विजय जनार्दन शेटे यांचा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. राहुल वल्टे, कॉलेजचे प्राचार्य रियाज शेख व श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रामनाथ पाचोरे यांनी शाल पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)