शैक्षणिकदृष्ट्या बारामती पॅटर्न नावारुपास येणार

त्या कलाकृतीने प्रेक्षकांचे डोळे पाणावले

वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मुलांनी सादर केलेल्या गणेश वंदना, आम्ही शिवबाचे मावळे, घुमर, तुफान आलया आदी गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तर कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या “बेटी बचाव, बेटी पढाव’ या कलाकृतीने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. तर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

डोर्लेवाडी – बारामती शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील खासगी शाळांनीही आपला गुणात्मक दर्जा उंचावल्यामुळे भविष्यात शैक्षणिकदृष्ट्या बारामती पॅटर्न नावारूपास येईल, असे मत बारामती टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी व्यक्‍त केले.

डोर्लेवाडी (ता.बारामती) येथील संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमा प्रसंगी पवार बोलत होत्या. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, डॉ. प्रतिभा नेवसे, नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, स्कूलचे अध्यक्ष अभिजीत निंबाळकर, सुमित्रा निंबाळकर, सरपंच बाळासाहेब सलवदे, उपसरपंच सुनिता खोत, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अब्बास नाशिकवाला, शांतीकुमार सराफ, उद्योजक स्वप्नील मुथा, दत्तात्रय बोराडे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव, छत्रपतीचे माजी संचालक रमेश मोरे, संतराम घुमटकर, अमोल निलाखे, नवीद पठान, मंगेश कचरे, दीपक पडकर आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार हनुमंत पाटील म्हणाले की, पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत असतानाच त्यांच्यामधील इतर गुणांची माहिती घेऊन त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यापुढे मुले सुसंस्कृत करण्याबरोबर ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त कसे राहतील याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे सचिव सोमनाथ भिले यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)