शेवरलेच्या ग्राहकांसाठी सर्व्हिस सेंटर

हिंजवडीमध्ये उद्‌घाटन : चार हजार चौरस फुटात अद्यावत सुविधा

हिंजवडी – प्रख्यात कार निर्माता कंपनी शेवरलेच्या ग्राहकांना कारची रिपेरिंग आणि सर्व्हिसिंगची चांगली सुविधा जवळच मिळावी, यासाठी ऍस (एसीई) ऑटोमोटिव्ह ग्रुपने शेवरलेचे अधिकृत सर्व्हिस सेंटर सुरु केले आहे. ग्राहकांना आणि कार प्रेमींसाठी सर्व्हिसिंग आणि रिपेरिंगसाठी एस. शेवरले विश्‍वासाचे स्थान आहे.

वाकड-हिंजवडी रोड, गेटवे हॉटेलसमोर आणि डी-मार्ट आधी हे भव्य सेंटर तयार करण्यात आले असून सर्व पार्टस्‌ उपलब्ध असून वन स्टॉप सोल्युशन असल्याचे ऍस ऑटोमोटिव्ह ग्रुपने सांगीतला. जनरल मोटर्स ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट (कमर्शियल ऑपरेशन्स) मार्कस्‌ स्ट्रेनबर्ग यांच्या हस्ते व रिजनल मॅनेजर-वेस्ट अश्‍विन कामत, एरिया मॅनेजर मनू श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सर्व्हिस सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले.

सर्व्हिस सेंटर चार हजार चौरस फूट आहे. 18 ते 20 कार रोज येथे सर्व्हिसिंग आणि रिपेरिंग केल्या जाऊ शकतात. ग्राहकांना पार्किंगसाठी तीन हजार चौरस फूट जागा आहे. सर्व अत्याधुनिक यंत्र सामुग्री व अत्यंत उच्च प्रशिक्षित स्टाफ एस. शेवरले सर्व्हिस सेंटरमध्ये आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)