शेवटी आम्ही खराब खेळ केला – मिचेल स्टार्क

अडलेड: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला 9 बाद 250 धावात रोखण्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाला यश आले आहे. परंतु, भारताला लवकर बाद करण्याची सुवर्ण संधी गमावली, असे मत मिचेल स्टार्कने वक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ आज केवळ चार मुख्य गोलंदाजांसह खेळात होता. सर्व गोलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखून कामगिरी उंचावली. मिचेल स्टार्क (2/63), पेट कमिन्स (2/49), जोशे हेजलवूड (2/52) आणि नॅथन लायन (2/83) याने प्रत्येकी 2 बळी मिळवले. खराब सुरुवातीनंतर एकवेळ . भारतीय संघाची अवस्था 6बाद 127 अशी झाली होती. परंतु, त्यानंतर शतकवीर चेतेश्वर पुजाराच्या 123 धावांच्या झोरावर भारताने पहिल्या दिवसाखेर 250 धावापर्यंत मजल मारली. याबाबत बोलताना स्टार्क म्हणाला, मला वाटते आम्ही पहिले चार तास खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतरचा एक तासही चांगला मारा केला. परंतु, शेवटी आमही थोडे कमी पडलो. चेतेश्वर पुजाराने आमच्या जलदगती माऱ्याचा चांगला प्रतिकार केला. त्याला विपरीत परिस्थितीत कसी खेळी करण्याचा अनुभव आहे. दबावात चांगली फलंदाजी करत त्याने साकारलेली शतकी खेळीचे महत्व जास्त आहे.

-Ads-

पुढे बोलताना तो म्हणाला, हा सामन्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुनरागमन करण्याची साधी आहे. या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य ठेवणे गरजेजे आहे. आम्ही मागील आठवड्यात भारताविरुद्ध कसे खेळायचे याचे रणनीती आखली होती. मागील काही सामने पाहून भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीतील कच्चे दुवे शोधले होते. चेंडूवरील चमक कमी झाली तरी आम्ही भारतीयांना जास्त धावा दिल्या नाहीत आणि सामन्यांवरील नियंत्रण जाऊ दिले नाही.

गोलंदाजांना चांगल्या क्षेत्ररक्षणचा फायदा कसा मिळाला हे सांगताना तो म्हणाला, पेट कमिन्सने पुजाराची खेळी एका थेट फेकीवर संपुष्टात आणली. तर उस्मान ख्वाजाने विराटचा अफलतून झेल घेतला. मागील 8-9 महिन्यात ख्वाजा कसून सराव करत आहे. या मालिकेत तो खूप धावा जमवले अशा आहे.

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)