शेवटच्या श्वासापर्यंत मला बॉल टॅम्परिंगची खंत राहिल- डेव्हिड वॉर्नर

 बॉल टॅम्परिंग प्रकरणात खेद व्यक्त करत वॉर्नरची हताश प्रतिक्रिया

सिडनी -“माझ्यामुळे सगळ्यांनाच कमीपणा आलाय, मी तुमची मान शरमेनं खाली घातली. पण तुमचा विश्वास परत मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. या प्रकरणात माझाही तितकाच सहभाग होता याची खंत मला आयुष्यभर सलत राहिन’ असं म्हणत साश्रू नयनानं ऑस्ट्रेलियन खेडाळू डेव्हिड वॉर्नरनं चाहत्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली.

नुकताच डेव्हिड ऑस्ट्रेलियात परतला आहे. लाखो चाहत्यांची मनं दुखावल्या प्रकरणी तसेच ऑस्ट्रेलियाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन केल्याप्रकरणी डेव्हिडनं अखेर सर्वांसमोर येऊ माफी मागितली आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी 12 महिने क्रिकेटबंदीची शिक्षा झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर यानं माफी मागितली आहे. सिडनीत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला रडू कोसळले आणि झाल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केलं. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर अस्वस्थ झालेल्या डेव्हिड वॉर्नरने पत्रकार परिषद घेत ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे असे म्हणत आपल्या उपकर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरलाही अश्रू अनावर झाले. अत्यंत भावनिक होत त्याने यापुढे आपल्याला आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायला मिळेल अशी आशाही वाटत नसल्याचेही त्याने म्हटले आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर या दोन्ही खेळाडूंवर 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नरने आपली हताश प्रतिक्रिया व्यक्त करत आता आपले ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधले करियर संपल्यात जमा आहे अशीच भावना व्यक्त केली.

बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची चांगलीच बदनामी झाली. मात्र मला हा विश्वास आहे की टीम ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा नव्या जोषात आणि नव्या उत्साहात परत येईल. मी त्या संघाचा भाग आता नसेन असेच मला वाटते आहे कारण एवढे सगळे प्रकरण झाल्यावर मला वाटत होते की कदाचित मला मी जी चूक केली आहे त्यासाठी मला माफ केले जाईल. मात्र आता माफी मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की यापुढे मी टीम ऑस्ट्रेलियाचा भाग असेन असे म्हणत त्याने देशाची माफी मागितली आहे.

शनिवारच्या पत्रकार परिषदेत बॉल टॅम्परिंगबाबत डेव्हिड वॉर्नरने वारंवार खेद व्यक्त केला. हे सगळे प्रकरण घडल्यावर डेव्हिड वॉर्नरने पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक नागरिकाची मी माफी मागतो. तुम्ही क्रिकेटप्रेमी नसलात तरीही तुमची माफी मागतो. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची कितीही वेळा माफी मागायला तयार आहे. मी टीम ऑस्ट्रेलियाचा उप कर्णधार म्हणून मुळीच चांगली कामगिरी करू शकलो नाही असेही वॉर्नरने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)