शेवटच्या रविवारी पुणेकरांनी फस्त केले 26 टन मासळी, 500 टन चिकन आणि तितकेच मटण

पुणे- आषाढातील शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी मांसाहारी जेवणाचा बेत आखला होता. तरूणांनी पार्टी, हॉटेलमध्ये जावून मेजवानी करण्यास पसंती दिली. रविवारी तब्बल 26 टन मासळी, सुमारे 500 टन चिकन आणि तितकेच मटण पुणेकरांनी फस्त केले.

आज (दि. 4 ऑगस्ट) आषाढातील शेवटचा रविवार आहे. पुढच्या रविवारी (दि. 12 ऑगस्ट) रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यानंतर गणेशोत्सव असतो. गणेशउत्सवातही मांसाहार केला जात नाही. कित्येकजण दिवाळीपर्यंत मासाहार करण्याचे टाळतात. या पार्श्‍वभूमीवर आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पुणेकरांनी मांसाहाराचा बेत आखला होता. सुट्टीचा फायदा घेत पुणेकरांनी हॉटेलमध्ये जावून, तर ग्रुपमधील लोकांनी पार्ट्या करण्यास पसंती दिली. घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी आणि चिकनला चांगली मागणी होती. सकाळपासूनच नागरिकांनी दुकानांसमोर खरेदीसाठी गर्दी केली होती. नेहमीच्या रविवारच्या तुलनेत चिकनची आज तब्बल 40 टक्के जास्त विक्री झाल्याचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले, घरगुती, हॉटेल आणि केटरींग व्यावसायिकाकडून चिकनला मोठी मागणी होती. रविवारी शहरात तब्बल 450 ते 500 टन चिकनची विक्री झाली. त्या तुलनेत आवकही चांगली झाली. त्यामुळे आवक आणि मागणी यातील समतोलामुळे भाव स्थिर होते. तर मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, आषाढातील शेवटच्या रविवारच्या तुलनेत अपेक्षित मटणाला मागणी नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, नेहमीच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त मागणी होती. विशेषत: हॉटेल व्यावसायिकांकडून मटणाला जास्त मागणी होती. तर मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी म्हणाले, मागील तीन-चार दिवसांपासून मासळीला मागणी जास्त आहे. मात्र, आज आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार आहे. त्यामुळे मासळीला मागणी अधिक होती. पार्ट्या करणाऱ्या ग्रुपकडून मासळीला अधिक मागणी होती. त्यानंतर हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती विक्रेत्यांकडूनही मासळीला मागाणी होती. शहरात तब्बल 26 टन मासळीची आज विक्री झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)