शेवटच्या दिवशी चौघांचे सहा अर्ज

शेवटच्या दिवशी छाननीमध्ये दोन अर्ज अवैध
जगन्नाथ कुंभारांना श्रद्धांजली म्हणून भाजपची माघार

फलटण नगरपालिकापालिका पोटनिवडणूक

फलटण – फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12अ च्या पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारजणांचे सहा अर्ज दाखल झाले होते. आज दाखल अर्जांची छाननी होवून 2 अर्ज वैध तर 2 अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली.

प्रभाग क्रमांक 12अ मधील राष्टवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारजणांचे सहा अर्ज दाखल होते. आज दाखल अर्जांची छाननी झाली. त्यात संदीप जाधव आणि कॉंग्रेसचे प्रवीण अडसूळ यांचे अर्ज अवैध ठरले. हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागातून राष्टवादी कॉंग्रेसने दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या पत्नी रंजना कुंभार यांना उमेदवारी दिली आहे. राष्टीय कॉंग्रेसने माजी नगरसेवक राजेश आनंदराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोघात आता दुरंगी सामना होत आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी असून जर कोणी अर्ज मागे घेतला नाहीतर 27 जानेवारीला मतदान आणि 28 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले असून दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजली म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)