शेवटच्या क्षणी सेहवागच्या भाच्याची झाली आयपीएलमध्ये एन्ट्री

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मौसमाचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात सध्या एका जोरदार चर्चा सुरु आहे. या खेळाडूला किंग्स इलेव्हन पंजाबने खरेदी केले आहे.
मयंक डागर असे या खेळाडूचे नाव असून त्याला पंजाबने 20 लाख रुपयात खरेदी केले आहे. मयंकने अंडर-19 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळाने सर्वानाच प्रभावित केले आहे. पण त्यानंतरही मयंक आयपीएल लिलावात अनसोल्डच होता. पण शेवटच्या क्षणी मयंकला पंजाबने त्याच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केले.
पंजाबचा मेन्टॉर वीरेंद्र सेहवागने मयंकची कामगिरी लक्षात घेत त्याला संघात स्थान दिले. याशिवाय मयंक सेहवागचा भाचाही आहे. दरम्यान, मयंक आपल्या खेळाशिवाय हॅण्डसम लूकमुळेही बराच चर्चेत असतो. सोशल मीडियावर मयंकचे फॉलोअर्सही बरेच आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 75 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)