शेवटच्या क्षणीही ‘डिम्पल’चा हात ‘राजेश खन्नां’नी सोडला नाही..!

पुष्पा… रो मत, आय हेट टियर्स असं म्हणत ज्याने असंख्य चाहत्यांना ज्याने आपल्या अभिनयाने भुरळ घातली. त्या सुपरस्टार राजेश खन्ना यांनी साऱ्यांनाच रडायला लावले. जरी डिम्पल या त्यांच्यासोबत राहत नव्हत्या मात्र शेवटच्या क्षणी डिम्पलचा हात त्यांच्या हातात घेतला होता. आणि पत्नी डिम्पलसमोरच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

सुपरस्टार राजेश खन्ना यांची अदा आणि नखरे त्यांच्या चाहत्यांनी प्रेमळपणे स्वीकारले. दृष्ट लागावी अशी अफाट लोकप्रियता त्यांना मिळाली. म्हणूनच की काय त्यांच्या कारकीर्दीला आणि व्यक्तिगत आयुष्याला जणू दृष्टच लागली.

राजेश खन्ना हे यकृताच्या विकाराने आजारी होते. त्यामुळे त्यांनी अन्न-पाणी सोडले. लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही मिळाला, परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली. ते कोणत्याही औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. डॉक्‍टरांनी सर्व आशा सोडल्या होत्या. त्यातच त्यांनी आपल्या पत्नीच्या हातात हात ठेवत अखेरच्या क्षणी ही दाखवून दिले की, त्यांचे डिम्पल यांच्यावर खूप प्रेम होते. राजेश खन्ना यांच्या अखेरच्या क्षणी मुलगी रिंकी आणि टिव्‌िंकल आणि जावई अक्षयकुमार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)