पुणे – गणेशोत्सव काळात शेवटच्या पाच दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने पुणेकरांचा उत्सवाचा आनंद घेता येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

याबाबत 2013 पासून आपण स्वत: केलेल्या मागणीला यश आले आहे. या संबंधात काढलेल्या पत्रकात मोहन जोशी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गेली काही वर्षे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक वापरण्यास शासनाने मर्यादा घातली होती. त्यानुसार या काळात फक्त तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येत होते. उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत देखावे पाहण्यासाठी लाखो पुणेकर येतात. त्याचबरोबर शहराबाहेरून येणाऱ्यांची संख्या पाहाता शासनाकडे 2013 सालापासून मी केलेल्या मागणीनुसार शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याबाबत पाठपुरावा केला होता, त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी दिली, असल्याचे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)