शेवगा, बटाटा, लसूण वधारला

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात भाजीपाल्याची आवक दिवाळीनंतर या आठवड्यात वाढली आहे. फळभाज्यांमध्ये शेवगा, तोंडलीव पावट्याचे भाव वधारले. मिरचीआणि दुधी भोपळ्याची आवक वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. याशिवाय बटाट्याची आवक वाढून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. कांद्याची आवक व भावदेखील वधारले आहेत. याशिवाय कोथिंबीरीची आवक वाढूनही भाव मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आले आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 774 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 24 हजार 10 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 121 क्विंटलने वाढली आहे; तर पालेभाज्यांची आवक चार हजार 205 गडड्यांनी वाढली आहे.

कांद्याची आवक 13 क्विंटलने घटून भावात किरकोळ 50 रुपयांची वाढ झाली. बटाट्याची 58 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 18 क्विंटलची वाढ झाली आहे; तर भावात 250 रुपयांची वाढ झाली. भेंडीची आवक चार क्विंटलने वाढुन भावात 250 रुपयांची घट झाली. गवारीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव मात्र 500 रुपयांनी घसरले. तसेच टोमॅटोची 46 क्विंटल आवक वाढुन, भाव मात्र 100 रुपयांनी घटले. मटारची आवक स्थिर राहून, भाव 500 रुपयांन वधारले. घेवड्याची आवक दोन क्विंटलने वाढून भाव250 रुपयांनी वधारले. दोडक्‍याची आवक दहा क्विंटलने वाढून, भावात 500 रुपयांची घट झाली. लसणाची आवक तीन क्विंटलने घटून, भाव 100 रुपयांनी वधारले. आल्याची आवक दोन क्विंटलने घटून, भाव मात्र 750 रुपयांनी वाढले. मिरचीची आवक पाच क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. तसेच दुधी भोपळ्याची आवक एक क्विंटलने घटून, भाव स्थिर राहिले.

-Ads-

सलग दुसऱ्या आठवड्यात कारल्याची आवक स्थिर भाव 100 रूपयांनी रुपयांनी वधारले. गाजराची आवक एक किंटलने घटून, भाव मात्र 500 रुपयांनी वधारले. फ्लॉवरची आवक आठ क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिला. कोबीची आवक 36 क्विंटलने वाढून भावात 50 रुपयांची वाढ झाली. वांग्याची आवक तीन क्विंटलने वाढूनही भावात 750 रुपयांची घट झाली. लिंबाची आवक तीन क्विंटलने वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. काकडीची आवक चार क्विंटलने वाढून, भाव 100 रुपयांनी वधारले. सुरणची आवक स्थिर राहून, भाव 2250 रुपयांनी वधारले.

शेवग्याची आवक एक क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले. राहिले. ढोबळी मिरचीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 100 रुपयांनी घसरले. घोसावळ्याची एक क्विंटल आवक होऊन, भाव 1000 रुपयांवर स्थिरावला. तोंडल्यांची आवक तीन क्विंटलने घटून, भावात 500 रुपयांची वाढ झाली. बीटची आवक स्थिर राहून, भावात किरकोळ 50 रुपयांची वाढ झाली. पावट्याची एक क्विंटल आवक वाढून, भाव 1250 रुपयांनी वधारले. याशिवाय चवळीची आवक स्थिर राहून, भाव 350 रुपयांनी वधारला. पापडीची आवक दोन क्विंटलने घटून 250 रुपयांनी घटले. मका कणीसची आवक आठ क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या आठ हजार 640 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची नऊ हजार 100 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची एक हजार गड्ड्या, मुळे 550 गड्ड्या, पुदीना 650 गडड्या, पालक दोन हजार 760 गड्ड्या, तर कांदापातीच्या 600 गडड्‌यांची आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)