शेवगाव शहरासह गावोगावी बंद उत्स्फुर्त

शेवगाव - शहरात अांदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांसाठी नाष्टा, चहाचीही काहीजणांकडून व्यवस्था करण्यात आली होती.

शेवगाव – तालुक्‍यासह शहरात कडकडीत बंद पाळून क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आला.आज शेवगाव शहरासह तालुक्‍यात गावोगाव उत्सफुर्तपणे बंद पाळण्यात आला.

शेवगाव, अमरापूर, ढोरजळगाव, घोटण, खानापुर, एरंडगाव, भातुकडगाव, शहरटाकळी, चापडगाव, बोधेगाव, बालमटाकळी, सामनगाव, खरडगाव, आखेगाव आदी जवळपास सर्वच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही गावात रस्त्यावर टायर जाळुन मराठा समाजाने आपला संताप व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेवगाव शहर बंद ठेऊन सकल मराठा समाजाने क्रांती चौकात सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यत चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात मोटार सायकल रॅलीने येऊन सहभागी झाला होता. मुस्लिम समाजाने या आंदोलनास पाठींबा जाहीर केला. दिवसभर रस्त्यावर ठिय्या देऊण अनेक मराठा बांधवांनी आपआपले मनोगत व्यक्‍त केले. तर अविनाश वाडकर यांच्या सदाबहार कार्यक्रमातुन मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज, देशभक्‍तीपर गीतने सर्वांना मोहित केले.

काल रात्री 12 पासून एस.टी बंद करण्यात आली होती. मुक्कामाच्या गाड्या ही सोडण्यात आल्या नाहीत. शाळा बंद होत्या, सर्व एस.टी. बस आगारात उभ्या होत्या, चारही मार्गावर वाहनांचा शुकशुकाट होता. शासकीय कार्यालये ओस पडली होती. खेडोपाडी बंद पाळण्यात आल्याने ते ओस पडले होते. असा बंद आम्ही कधी पाहिला नाही अशी चर्चा वृद्ध व्यक्‍तीत चालु होती. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते.आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या युवकाच्या कुटुंबांस माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी एक लाख रुपये मदतीचा धनादेश यावेळी सुपुर्द केला. कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)