शेवगाव शहरात दोन गटात तणाव

व्हॉट्‌सऍप ग्रुपवर अक्षेपार्ह मजकूर : एका युवकाला मारहाण

शेवगाव – व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने शहरात दोन गटात तणाव निर्माण झाला होता. मजकूर टाकणाऱ्या युवकाला एका गटाने मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला. त्यास उपचार्थ नगर येथे हलविण्यात आले आहे. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

व्हॉट्‌सअपॅ ग्रुपवर एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा मजकूर टाकल्याने शेवगाव शहरात गुरुवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. याबाबत रिजवान शेख यांनी अभिमन्यू उर्फ अभि कुसळकर याच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे. मजकूर टाकणाऱ्या या युवकास 30 ते 40 जणांच्या जमावाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पैठण रोडवर लोखंडी गज, रॉडने बेदम मारहाण केली. यात तो जबर जखमी झाला. त्यास उपचारार्थ नगर येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेने तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरात पोलीस तैनात करण्यात आले होते. नगरहूनही काही कुवम दाखल झाली होती. सांयकाळी परिस्थिती निवळी गेली. मात्र काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस दक्षता घेत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)