शेवगाव मुख्याधिकारीपदाचा पदभार अंबादास गर्कळ यांनी स्वीकारला 

शेवगाव – शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अंबादास नारायण गर्कळ यांनी आज पदभार स्वीकारला. तीन वर्षापूर्वी शेवगाव नगरपरिषदेची स्थापना झाली, तेंव्हापासून आजतागायत परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची कामे रखडत होती. आता अंबादास गर्कळ हे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून आल्याने कामे मार्गी लागतील, असा विश्‍वास नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे. गर्कळ हे तालुक्‍यातील बोधेगाव येथील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी अडीच वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधेगाव येथे प्राथमिक शिक्षक तसेच त्यानंतर अडीच वर्ष विक्रीकर म्हणून व दोन वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून सेवा केलेली आहे. शहरात असलेल्या मुलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा, कर वसुली व घनकचरा व्यवस्थापन यावर भर दिला जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेचे कर्मचारी, विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)