शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी पाच कोटी मंजूर- आ. राजळे

शेवगाव: शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

आ. राजळे म्हणाल्या मतदारसंघातील ग्रामीण भागात विशेषतः रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग होता. तो भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष सहकार्य केले. जिल्ह्याला 20 कोटी रुपयांच्या प्राप्त झालेल्या निधीपैकी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाला पाच कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये शेवगाव तालुक्‍यातील मौजे सुलतानपूर खु. अंतर्गत देवढेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 25 लाख, मौजे मजलेशहर अंतर्गत पाटापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (देवटाकळी रस्ता) 20 लाख, मौजे विजयपूर अंतर्गत कांबळेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 40 लक्ष, मौजे लख्मापुरी अंतर्गत फुंदेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख, मौजे भातकुडगाव अंतर्गत राणूबाईवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष, मौजे बऱ्हाणपूर अंतर्गत डोंगरेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 20 लाख, मौजे लाडजळगाव अंतर्गत कोकटवाडी तांडा ते शेवगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष, मौजे भायगाव अंतर्गत माऊली डेअरी ते सांगळेवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 30 लक्ष, मौजे एरंडगाव भागवत अंतर्गत हनुमान मंदिर ते मारोती बंडेराव भागवत घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष, मौजे वरूर अंतर्गत लाव्हाटवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष, मौजे गदेवाडी अंतर्गत गदेवाडी फाटा ते गदेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष, मौजे मुंगी अंतर्गत मिसळवाडी (बोरगाव ) रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष, मौजे वरुर बु. अंतर्गत वरुर ते प्रजिमा 38 रस्ता डांबरीकरण करणे 30 लक्ष, मौजे आव्हाने अंतर्गत पानसरेवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 35 लक्ष, मौजे आखतवाडे अंतर्गत बोरवणरस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 35 लक्ष रुपये, या कामांना मंजुरी मिळाली आहे.

त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्‍यातील मौजे मिडसांगवी अंतर्गत भवारवाडी – धारवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 30 लक्ष, मौजे वाळुंज अंतर्गत आंधळेवस्ती (दुलेचांदगाव) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 30 लक्ष, मौजे सोनोशी अंतर्गत सोनोशी फाट्याकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष, मौजे दुलेचांदगाव अंतर्गत खेडकरवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 30 लक्ष, मौजे हात्राळ अंतर्गत पटारे-शिंदे वस्ती ते 29 मैल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष, मौजे ढगेवाडी (खरवंडी कासार) येथील भेटीचा वड रस्ता डांबरीकरण करणे 35 लक्ष रुपये या कामांना मंजुरी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)