शेवगाव पाथर्डीचा आमदार राष्ट्रवादीचाच हवा : रोहित पवार

पाथर्डी: ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादीचाच व्हायला हवा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पाथर्डी आले असता राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. हेमंत सुपेकर यांच्या निवासस्थानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेवक महेश बोरुडे, शहराध्यक्ष योगेश रासने, स्वप्नील संतोष ढोले, चंद्रकांत भापकर, जमीर शेख, प्रसाद सबलस, विवेक बोरुडे, रोहित पुंड, परवेज मणियार, अक्रम आतार, योगेश वाळके,बंडू अकोलकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार म्हणाले, तरुणांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवावा, दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी केव्हाही संपर्क करा, मी सदैव पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक महेश बोरुडे यांनी केले तर प्रसाद सबलस यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)