शेवगाव तालुक्‍यात उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

शेवगाव – शेवगाव शहरासह तालुक्‍यात ठिकठिकाणी 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण झाले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेकांनी आपल्या व्यवसायाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त साधला. पंचायत समिती कार्यालयात दिवगंत स्वातंत्र्य सैनिकाच्या वृद्ध पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यसैनिकाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.

येथील तहसिल कार्यालयामध्ये शासकीय ध्वजारोहण तहसिलदार दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील सेवानिवृत्त सैनिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस व भारदे विद्यालयाच्या एन. सी. सीच्या मुला मुलींच्या ग्रुपने मानवंदना दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवडुक विभागाचा राजदूत म्हणून नियुक्त केलेल्या चैतन्य मुरदारे याचा तहसिलदार पाटील व पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पंचायत समितीमध्ये प्रजासत्ताक खानापूरचे दिवगंत स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मोरे यांच्या वृध्द पत्नी लक्ष्मीबाई मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, उपसभापती शिवाजी नेमाने, गटविकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे आदी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)