शेवगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

शेवगाव – वसतीगृहाशेजारीच टाकण्यात येणाऱ्या गावातील घनकचऱ्याची अन्यत्र व्यवस्था करावी, या मागणीसाठी येथील आनंद निवासच्या मुलींनी आज बुधवारी (दि.23) तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकदा अर्ज विनंत्या करूनही ही जागा बदलत नसल्याने येत्या आठ दिवसात पर्यायी व्यवस्था केली नाही, तर तो कचरा नगरपालिकेसमोर टाकून पेटवून देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी निवेदन स्विकारुन याप्रश्री लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, आनंद निवास येथील मुलींच्या वसतीगृहाशेजारी अनेक वर्षापासून शहरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येतो. या वसतीगृहात मुली व आरोग्य सेविका राहतात. या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील कचरा अनेक वेळा पेटवून देण्यात येतो. या धुरामुळे वसतीगृहातील मुलींना श्‍वासोच्छवासाचे आजार उद्‌भवत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पर्यायी जागेसंदर्भात काही पदाधिकारी राजकारण करत असून हा प्रश्‍न पत्रकारांनी उचलून धरल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यापर्यंत हे पदाधिकारी गेले आहेत. त्यांची ही दडपशाही जनता कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा टायग फोर्सचे राज्याचे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉ. संजय नांगरे, प्रकाश वाघमारे, फादर अनिल चक्रनारायण, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे याचीही यावेळी भाषणे झाली. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, संदीप मगर, क्रांती मगर, फादर व्हॅलेंट फर्नांडिस, सिस्टर लिसी, सिस्टर आराधना, सिस्टर लुसी, विजय बोरुडे, समीर शेख, मच्छिंद्र देहाडराय, एस.के.साळे, अनिल बोरुडे, श्रीधर मगर, विदयार्थिनी कोमल पवार, जयश्री डुकरे, स्वाती खंडागळे, नगरपालिकेचे अभियंता संदीप सोनटक्के, राजेंद्र इंगळे, रमेश खरात यांच्यासह विदयार्थी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)