शेवगावात वाहतूक कोंडी

sdr

शेवगाव: शेवगावात आज मोठी वाहतूक कोंडी अनुभवाला आली. शहरातून जाणारे पैठण- औरंगाबाद, पाथर्डी- नगर, नेवासे -श्रीरामपूर मार्ग हजारो वाहनांच्या गर्दीने फुलले होते. कोणत्याही मार्गावरील वाहन शहरातून बाहेर पडण्यासाठी जवळपास अडीच ते तीन तास लागत होते.शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शिकस्त केली, तरी हजारो वाहनाच्या गर्दी पुढे तेही हतबल झाले. यामुळे परिसरातील विवाह व अन्य कार्यक्रम अडीच-तीन तास उशिरा पार पडले.

आज मोठी विवाह तिथी होती. शहरातील सर्व मंगल कार्यालयात विवाह होते. एकट्या शेवगाव शहरात 20 पेक्षा अधिक विवाह सोहळे होते. याशिवाय नजीकच्या खानापूर, दहिफळ, आखेगाव, बोधेगाव, बालम टाकळी, भायगाव, अमरापूर या गावातील मंगल कार्यालयातही विवाह होते. काही गावात सुपारीचे मोठे कार्यक्रम होते. याशिवाय येथील काही ज्येष्ठांचे दहावे पैठण व प्रवरा संगमला होते. त्यातच ज्ञानेश्‍वर, मुळा, वृद्धेश्‍वर, केदारेश्‍वर या सहकारी तर गंगामाई या खाजगी साखर कारखान्याची ऊस वाहतुकीच्या ट्रेलरची व ट्रॅक्‍टरची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज रविवारचा सर्वांच्या सुट्टीचा दिवस त्यातच आठवडे बाजार आणि सोनेमियाचा यात्रोत्सव असल्याने शहरवासीय व पाहुण्यांची वर्दळ रस्त्यावर होती. शेवगावच्या सर्वच रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. साधा रस्ता ओलांडण्यास पायी माणसांनाही अर्धा तास ताटकळावे लागत होते, अन्य वाहनांची गत तर बेहत्तर होती. वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती, कोणत्याही रस्त्याने शहरातून बाहेर पडण्यास किमान तीन तास लागत होते. अशी वाहतूक कोंडी गेल्या कित्येक दिवसात झाली नसल्याचे जानकार बोलत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)