शेवगावात पर्यावरण समस्येवर दोन दिवसीय चर्चासत्र

शेवगाव: सद्य परिस्थितीत झालेला हवामानातील बदल, ओझोनलेयर कमी व बायोडायवरसिटी यामुळे वातावरणात असमतोल निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या नुकसानीस राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक पैलूसुद्धा कारणीभूत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी केले.

येथील न्यू आर्टस कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातील भूगोल विभाग अंतर्गत आयोजित भारतातील पर्यावरण समस्या या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. सप्तर्षी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करा, संशोधन करा व पर्यावरणाचे संतुलन राहील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करून मधमाशा व तत्सम कीटकामुळे हरितक्रांती होईल असे भाकीत केले. प्राचार्य डॉ. श्रीधर जाधव यांनी पर्यावरणाचे संतुलन राखले जावे याची जाणीव सर्वाना झाली पाहिजे, अन्यथा येणारा काळ हा मानवी जीवनासाठी विघातक ठरेल असा इशारा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले होते. यावेळी भोसले यांनीही पर्यावरणाच्या असंतुलनामुळे भविष्यकाळात उद्भवणाऱ्या समस्या कशा स्वरूपात सजीव सृष्टीला हानिकारक आहेत हे विषद केले. या चर्चासत्रामध्ये मानव आणि पर्यावरण, पाणी व्यवस्थापन आणि त्यासंदर्भातील प्रकल्प, जागतीक तापमानवाढ, शाश्‍वत शेती आणि पर्यावरण संरक्षण, जागतिक हवामान बदल व परिणाम या विषयावर पेपर सादर होणार आहेत. प्रभारी प्राचार्य डॉ. रावसाहेब कासार यांचेही भाषण झाले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. पी. वाय. ठोंबरे यांनी प्रस्ताविक केले. निर्मलाताई काटे, रिसोर्स पर्सन डॉ. रमाकांत कस्पटे, उपप्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे , विविध महाविद्यालयातून आलेले शिक्षक, संशोधक, महविद्यालयातील शिक्षक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अनिता आढाव यांनी केले. प्रा. किशोर कांबळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)