शेवगावमध्ये ऍड. ढाकणेंच्या पुतळ्याचे दहन

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल निषेध
शेवगाव – स्व. गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाची मोठी फसवणूक केली असून पंकजा मुंडे ही निवडणुका जवळ आल्याने वंजारी समाजला फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अपशब्द काढल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन करुन शेवगाव भाजपच्या वतीने निषेध व्यक्‍त करण्यात आला.
स्व.गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाची मोठी फसवणूक असून हा समाज पुन्हा ओबीसीमध्ये येणे अशक्‍य असतांनाही पंकजा मुंडे या त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत प्रयत्न करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ऍड. ढाकणे यांनी केला. त्याच्या निषेधार्थ बुधवार भाजपच्या वतीने शहरातील क्रांती चौकामध्ये ऍड.ढाकणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, शब्बीर शेख, अजय भारस्कर, उमर शेख, महेश फलके, दिनेश लव्हाट, तुषार वैद्य, नगरसेवक अरुण मुंढे, सुनिल रासने, रवि सुरवसे, दिगंबर काथवटे, अभय पालवे, राहूल बंब, अविनाश देशमुख आदी सहभागी झाले होते.
स्व. मुंडे यांनी ऍड. ढाकणे यांना दोन वेळा विधानसभेचे तिकिट तर दोन वेळा जिल्हाध्यक्षपद दिले. ते आज हायात नसतांना ढाकणे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. स्व.मुंडे यांची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा डाव असून भाजप व वंजारी समाज हे कदापी सहन करणार नाही. स्व.मुंडे यांच्या बद्दल पुन्हा बोलल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देवू असा इशारा अरुण मुंढे, बापुसाहेब पाटेकर, वजीर पठाण, रासने, खेडकर यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)