शेवगावपट्टीतील वीस वर्षांपासून वादात असलेला रस्ता सर्वांसाठी खुला

उरूळी कांचन- शिंदवणे (ता. हवेली) येथील शेवगावट्टीतील रस्ता गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. मात्र सरपंच गणेश महाडिक आणि ग्रामस्थांच्या मध्यस्तीने हा प्रश्‍न मार्गी लागला असून, हा रस्ता आता सर्वांसाठी खुला करण्यात आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिंदवणे येथील शेवगावपट्टी या ठिकाणच्या रस्त्याबाबत शेतकऱ्याच्या किरकोळ आणि स्थानिक वाद असल्याने गेल्या वीस वर्षांपासून हा रस्ता वहिवाटीसाठी बंद होता. सर्वे नंबरच्या वादातील रस्ता असल्याने त्यातून मार्ग निघत नव्हता आणि शेवगापट्टी या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांचे क्षेत्र असल्याने वहिवाटीसाठी रस्त्याची गरज होती. यातून मार्ग काढण्यासाठी सरपंच गणेश महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब महाडिक, जनार्दन कामठे, विठ्ठल शेडकर, पांडुरंग शेडकर, हरी खेडेकर, माउली महाडिक, सोमनाथ चव्हाण, दत्ता गाडेकर, महेंद्र महाडिक, मुन्ना खेडेकर, विशाल खेडेकर,दीपक खेडेकर यांनी आपसातले वाद मिटवून रस्ता सर्वांसाठी खुला करण्यासाठी मध्यस्थी केल्याने वीस वर्षांपासून बंद असलेला रस्ता सर्वांसाठी खुला करून लोकसहभागातून रस्ताचे रुंदीकरण करण्यात आले आहे.
या रस्त्यामुळे नागरिकांनी आपल्या शेतातील माल आणि शेताची मशागत करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याची माहिती सरपंच गणेश महाडिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)