शेळगावकरांना लवकरच शुद्ध पाणी मिळणार

निमसाखर- शेळगाव (ता. इंदापूर) या गावची नुकतेच जागतिक बॅंकेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या जलस्वराज्य प्रकल्प 2 या योजनेअंतर्गत निवड झाली आहे. या योजनेकरिता गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलशुद्धीकरण (ठज) यंत्र बसविण्याकरीत 17 लाख 39 हजांराहून अधिकचा निधी मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांच्या शुद्ध पाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
शेळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्री संत मुक्‍ताबाई मंदिरात जलस्वराज्य योजनेंतर्गत गावस्तरीय समिती ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उज्ज्वला बाबासाहेब शिंगाडे होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या समाज व्यवस्थापनच्या मेधा दातरंगे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ उज्ज्वला शिर्के यांनी या योजनेबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थितीतकडून पाणी प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी सरपंच उज्ज्वला शिंगाडे, उपसरपंच विठ्ठल शिंगाडे, वामन पारधे, वामनराव घाडगे, ग्रामपंचायत सदस्य रामदास शिंगाडे, बाळासाहेब ठोंबरे, रसूल शिंदे, छगन मोहिते, कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे, सर्जेराव शिंगाडे, ग्रामसेवक अधिकारी दत्तात्रेय इनामे, भिवाजी जाधव, विशाल बेदमुथा, डॉ. संतोष शिंगाडे, आजिनाथ जाधव, मनोहर शिंगाडे, छगन ननवरे, डी. डी. मोहिते, प्रकाश राऊत, आरोग्यसेविका के. एस. पांचाळ, आरोग्यसेवक आर. बिबे, पंचायत समितीचे पाणी गुणवत्ता सल्लागार गोरक्षनाथ आटोळे, अंगणवाडी सेविका सुशीला चवरे, लक्ष्मी लोंढे, प्रगती महिला बचत गटाच्या नंदा मोहितेसह अन्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव यांनी केले तर ग्रामसेवक दत्तात्रय इनामे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)