शेळके खूनप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

पुणे – तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (38) यांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रकरणात आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गुरूदेव रमेश मराठे (28. रा. वराळे ता. मावळ), बंटी उर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (35), संदिप सोवपान पचपिंड (30), खंडू उर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (30), आकाश दीपक लोखंडे (21), रूपेश सहादु घारे (25), राजेश दादाभाऊ ढवळे (30), शिवाजी भरत आढाव (24), अमित अनिल दाभाडे (23), सचिन लक्ष्मण ठाकर (26), देवानंद उर्फ देवीदास विश्‍वनाथ खर्डे, नितीन शिवाजी वाडेकर (22), दत्ता ज्ञानेश्‍वर वाघोले (22), सुरज विलास गायकवाड (22), अभिषेक उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्‍वर मारुती गायकवाड, अजय राजाराम हिंगे, पिंट्या उर्फ बाळु दत्तात्रय सांडभोर (33), अमोल अनिल लांढे (21), मॉन्टी उर्फ संकेत जगदीश नानेकर, पंकज कृष्णाजी आवटे (28) यांच्यावर कट करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. टोळीचा म्होरक्‍या शाम रामचंद्र दाभाडे, धनंजय प्रकाश शिंदे उर्फ तांबोळी यांचा मृत्यू झाला आहे.

मृत श्‍याम दाभाडे हा सराईत गुन्हेगार बरोबरच टाळीचा म्होरक्‍या होता; तर इतर आरोपी टोळीचे सदस्य आहेत. ही टोळी आर्थिक फायद्यासाठी संघटीत होऊन गंभीर गुन्हे करण्याची सवय आहे. मृत सचिन शेळके यांचा तळेगाव एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा आणि खडी पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. टोळीकडून शेळके यांच्याकडे हप्ता मागितला जात होता. परंतु, शेळके यांचा हप्ता देण्यास विरोध होता. तसेच, ते टोळीलाही जुमानत नव्हते. 2013 मध्ये सचिन शेळके यांना पैशासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याच कारणावरून श्‍याम दाभाडे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने कट रचला. ते तळेगाव स्टेशन रस्त्यावरील खांडगे पेट्रोल पंपासमोर 16 ऑक्‍टोबर 2016 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कारमधून जात असताना टोळीतील एकाने त्याच्या कारला धडक दिली.

यामुळे सचिन शेळके यांनी त्यांची कार थांबविली. त्यानंतर शेळके कारच्या बाहेर येताच त्यांना दांडक्‍याने मारहाण करून, धारधार हत्यारांनी वार करून तसेच गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकारणात शेळके यांच्या कुटुंबियांच्यावतीने सरकार पक्षाकडून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)