शेलार ग्रुप, रिग्रीन संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश

पहिली एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – शेलार ग्रुप आणि रिग्रीन या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पहिल्या एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंट्‌स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

-Ads-

धायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्टस क्रिकेट अकादमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या सामन्यात सोनिया डबीरने (78धावा) केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने मेटा स्कूलचा 7 गडी राखून पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. मेटा स्कूल संघाने 20 षटकांत 5 बाद 128 धावा केल्या. यात रोहिणी मोरे नाबाद 41, पूनम खेमनार 40, उत्कर्षा पवार 13, कल्याणी चावरकर 12 यांनी संघाच्या डावाला आकार दिला.

शेलार ग्रुपकडून कोमल झंझाद (2-16), तेजश्री ननावरे (1-12) व सोनिया डबीर (1-26) यांनी अफलातून गोलंदाजी करत मेटा स्कूल संघाला 128 धावांवर रोखले. शेलार ग्रुप संघाने विजयाचे आव्हान 16 षटकांत 3 बाद 129 धावा करून पूर्ण केले. सोनिया डबीरने 45 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. सोनियाला चार्मी गवईने 40 चेंडूंत नाबाद 36 धावांची संयमपूर्ण खेळी करत विजय मिळवून दिला. सोनिया डबीर सामन्याची मानकरी ठरली.

दुसऱ्या सामन्यात तेजल हसबनीसच्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर रिग्रीन संघाने ईश्वरी ग्रुपचा 6 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा खेळताना ईश्वरी ग्रुप संघाने 20 षटकांत 7 बाद 123 धावा केल्या. यात साक्षी कानडीने 34 धावा, ऋतू भोसलेने 23 धावा, श्रावणी देसाईने 14 धावा व निकिता आगेने 10 धावांची खेळी केली.

रिग्रीनकडून प्रिया भोकरेने 20 धावांत 3 गडी, तर श्रद्धा पाखरकरने 19 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल रिग्रीन संघाने 18.3 षटकांत 4 गड्यांच्या बदल्यात 127 धावा करून विजयाची पूर्तता केली. यात तेजल हसबनीसने 50 चेंडूंत 9 चौकारांसह 64 धावा व भक्ती शास्त्रीने 41 चेंडूंत 36 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. तेजल हसबनीस सामन्याची मानकरी ठरली.

 सविस्तर निकाल –

मेटा स्कूल- 20 षटकांत 5 बाद 128 धावा (रोहिणी मोरे नाबाद 41 (44), पूनम खेमनार 40 (38), उत्कर्षा पवार 13 (21), कल्याणी चावरकर 12 (11), कोमल झंझाद 2-16, तेजश्री ननावरे 1-12, सोनिया डबीर 1-26) पराभूत वि. शेलार ग्रुप- 16 षटकांत 3 बाद 129 धावा (सोनिया डबीर 78(45), चार्मी गवई नाबाद 36 (40), ईशा पठारे 1-19, कल्याणी चावरकर 1-19) सामनावीर- सोनिया डबीर;

ईश्वरी ग्रुप- 20ष टकांत 7 बाद 123 धावा (साक्षी कानडी 34 (47), ऋतू भोसले 23 (29), श्रावणी देसाई 14 (11), निकिता आगे 10 (11), प्रिया भोकरे 3-20, श्रद्धा पाखरकर 2-19, भक्ती शास्त्री 1-16) पराभूत वि. रिग्रीन- 18.3 षटकांत 4 बाद 127 धावा (तेजल हसबनीस 64 (50), भक्ती शास्त्री 36 (41), श्रावणी देसाई 2-6, शीतल वर्मा 1-5, निकिता आगे 1-27); सामनावीर- तेजल हसबनीस.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)