शेत जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

पिंपरी – शेत जमिनीत कुंपण व फलक लावत असताना पाच जणांनी बेकादेशीररित्या जमाव जमवून तिघांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथ बाळु बोराटे (वय-53, रा. बोराटे वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळासाहेब दशरथ सस्ते (वय-62), दिगंबर शिवाजी सस्ते (वय-30), राकेश शिवाजी सस्ते, विष्णु बाबुराव सस्ते (वय-53), अक्षय विष्णु सस्ते (वय-25 सर्व रा. सस्तेवाडी, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, बोराटे व त्यांचे दोन भाऊ हे बोऱ्हाडेवाडी येथील गट नं. 242 या शेतात कुंपण व फलक लावण्याचे काम करत असताना आरोपी तेथे आले व त्यांनी या तिघांशी वाद घालण्यास सुरुवात केली व शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच “”ही काय तुमच्या बापाची जमीन आहे का”, असे मोठमोठ्याने ओरडत बोराटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)