शेती पंपाच्या वीज पुरवठा पुर्ववत करा

आमदार भरणे यांचे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना साकडे

रेडा- उजनी धरण बॅक वॉटर भागातील इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या विद्युत पुरवठ्याची वेळ वाढवून द्यावी व पूर्ववत करावी अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भरणे यांनी आज (गुरुवार) निवेदन देऊन फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, इंदापूर तालुक्‍यातील उजनी धरण बॅक वॉटर भागातील नागरीकांना व शेतकऱ्यांना शेतीपंपाचा विद्युत पुरवठा दिवसा 8 तास व रात्री 10 तास असा सुरू होता;परंतु पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उजनी जलाशयावरील, शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सकाळी 6 व रात्री 6 तास करण्याबाबतचा आदेश दिला असल्याने शेतकऱ्यांची ऐन दुष्काळात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होणार आहे.
उजनी धरण भागातील हे बॅक वॉटर शेतकरी हे धरणग्रस्त आहेत. सोलापूर जिल्ह्यात सातत्याने उजनी धरणातून पाणी मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत असल्याने, धरणातील पाणीसाठा पातळी मोठ्याप्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवरील मोठा अन्याय होत आहे. या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे दिवसा 8 व रात्री 10 तास नियमित विद्युत पुरवठा शेतीपंपासाठी मिळण्याची नितांत गरज असून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे साकडे पत्राद्वारे घातले आहे.

  • उजनी धरण बॅक वॉटर भागातील इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्यायदेण्याबाबत त्यांना नियमित शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा होण्याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
    – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)