शेतीसाठी पुरेसे कर्ज वितरण

   सरलेल्या वर्षात दहा लाख कोटींचे कर्ज वाटप

नवी दिल्ली  – शेतीसाठी कर्ज पुरवठयाचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात सरकारला यश आले असून, 2017-18 मध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण झाले आहे.केंद्र सरकारने चालू, 2018-19 या वित्त वर्षांकरिता 11 लाख कोटी रुपयांच्या कृषी वित्त पुरवठयाचे लक्ष्य 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते.

-Ads-

चालू वित्त वर्षांत छोटया शेतकऱ्यांना करावयाच्या कृषी कर्जपुरवठयाचे प्रमाण वाढविण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आणण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगण्यात येते.अल्प तसेच कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी वाढीव कृषी कर्ज पुरवठयाची शिफारस सारंगी समितीने सरकारला केली आहे. मात्र याबाबतच्या शिफारसी अद्याप सरकारने स्वीकारलेल्या नाहीत.

केंद्रीय कृषी खात्याचे संयुक्त सचिव आशिष कुमार भुटानी यांनी सांगितले की, सरकारने गेल्या वित्त वर्षांसाठीचे कृषी वित्त पुरवठयाचे 10 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य पार केल्यानंतर आता चालू आर्थिक वर्षांतील 11 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्टही पूर्ण करण्यात येईल. शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा करणे अवघड नसून योग्य शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचविण्याचे खरे आव्हान असल्याचे ते म्हणाले.

गेल्या आर्थिक वर्षांत एकूण 10 लाख कोटी रुपयांपैकी 6.80 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज हे अल्प कालावधीसाठीचे पीक कर्ज होते; तर त्यापैकी 50 टक्के रक्कम ही छोटया शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या कर्जाची असल्याचे भुटानी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)