शेतीसाठी आर्वतन 10 जानेवारीनंतर

पुणे – खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी मुठा उजवा कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. शेतीसाठीचे हे आवर्तन येत्या 10 जानेवारीनंतर सुरू करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या नियोजनानुसार कालव्यातून रब्बी हंगामात शेतीसाठी दोन टप्प्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार 27 ऑक्‍टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत चार टीएमसी पाणी सोडण्यात आले. कालवा समितीतील निर्णयानुसार 15 ऑक्‍टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, कालवा फुटीच्या घटनेनंतर कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या वेळापत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर 27 ऑक्‍टोबरपासून आवर्तन सुरू करण्यात आले होते.

धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यातून रब्बीसाठी दोन टप्प्यांत आणि उन्हाळी एक आवर्तन घेण्याचे यापूर्वीच निश्‍चित करण्यात आले आहे. या आवर्तनांसाठी एकूण 11 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यापैकी 4 टीएमसी पाणी पहिल्या टप्प्यात सोडले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तन हे 1 एप्रिल, 2019 ते 10 मे, 2019 असे चाळीस दिवस करण्याचे नियोजन असून या कालावधीतही साडेतीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. जानेवारीनंतर कालव्यातून शेतीसाठी 50 दिवसांत साडेतीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. रब्बी हंगामाचे दुसऱ्या टप्प्याचे आवर्तन हे 10 डिसेंबर, 2018 ते 29 जानेवारी, 2019 असे 50 दिवस निश्‍चित केले होते. मात्र, त्यामध्ये आता बदल झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)