शेतीला पाणी मिळाले पाहिजे

खंडाळा तालुका हा मूळचा दुष्काळी तालुका. या तालुक्‍यातील जनतेची गेल्या पन्नास वर्षांपासून एकच मागणी आहे, की येथील शेतीला पाणी मिळाले पाहिजे. मात्र पाणी मिळत नसल्याने या परिसरात औद्योगिकरन व्हावे व भुमिपुत्रांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा. कारण या भागातील बहुतांश लोक मुंबई सारख्या ठिकाणी माथाडी कामाला जाऊन पोट भरतात. या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून शेतीच्या साठी पाणी आणि तरूणांना रोजगार ही प्रमुख मागणी होती.

आता आपल्याला दिसताना असे चित्र दिसते की निरा- देवधर, धोम बलकवडीचे पाणी, शिरवळ, खंडाळा आणि लोणंद येथील एमआयडीसी असे फार समृद्ध खंडाळा असे चित्र भासविले जात आहे परंतु ही वस्तुस्थिती नाही. यामध्ये खंडाळा तालुक्‍याची फार मोठी दिशाभूल रामराजे यांनी केली आहे. खंडाळा तालुक्‍यातील पश्‍चिमेला असलेली चौदा गावं तशीच दुष्काळी राहिलीत. धोम बलकवडीचे पाणी अत्यंत अल्प प्रमाणात प्रत्येक गावाला मिळाले. तसेच 1984 ला निरा देवधर हा प्रकल्प मंजूर करण्यात आला, 1993 ला भूमिपूजन करण्यात आले,परंतु आजही या प्रकल्पाचे पाणी खंडाळा तालुक्‍याला मिळू शकले नाही.

-Ads-

हे पाणी काहीही संबंध नसलेल्या बारामती, माळशिरस, इंदापुर यांना गेले अठरा वर्षे मिळत आहे. तसेच या तालुक्‍यातील सगळ्या औद्योगिक कारखान्यात आमदार व रामराजेंचे एजंट परप्रांतीय कामगारांचा भरना करून भुमिपुत्रांवर अन्याय करत आहेत. त्यामुळे स्थानिक तरूण आजही बेरोजगार आहे. खंडाळा तालुक्‍याची ही जी अवस्था दिसतेय तितकी समृद्ध नाही. जर खंडाळा तालुक्‍याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर सर्व जनतेने एकत्र येऊन विकासात सहभागी होऊन काम केले पाहिजे. तरचं खंडाळा तालुक्‍याची प्रगती होईल.

– ऍड. बाळासाहेब बागवान,
सातारा जिल्हा कॉग्रेस कमिटी उपाध्यक्ष

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)