शेतीच्या वादातून एकाला मारहाण

पिंपरी – शेतीतील खड्ड्यात माती भरण्याच्या वादातून पाच ते सहा जणांनी एकाला मारहाण झाली आहे. ही घटना दिघीमध्ये घडली.

याप्रकरणी रुपेश कृष्णजा फुगे (वय-36, रा. फुगे चाळ, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात भाऊसाहेब खंडू फुगे, मारुती खंडू फुगे, कृष्णाबाई खंडू फुगे, स्वाती भाऊसाहेब फुगे, रुपाली मारुती फुगे व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश फुगे हे शेतीतील खड्ड्यात माती भरत असताना भाऊसाहेब याने त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ करण्यात आला. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)