शेतीकडे चला हा मंत्र आत्मसात करणे आवश्‍यक

भुईंज – राज्यातील असंख्य शेतकरी वर्गाशी शासकीय अधिकारी म्हणून माझा जवळून संबंध आला. त्यांची अभ्यासूवृत्ती, शेतीमधील प्रयोगशीलता वाढावी तसेच त्यांचे जमिनीसंदर्भातील वाद मिटावेत, यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर किसन वीर कारखान्यावरील प्रकल्प पाहिल्यानंतर किसन वीर हा एक साखर उत्पादन करणारा कारखाना नसून शेतकरी हिताची आदर्शवत यशस्वी प्रयोगशाळा आहे. येथील प्रयोग पाहिले आणि शहरातील सद्यस्थिती पाहिली तर शेतीकडे चला हा मंत्र आत्मसाद करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि वाई तालुका ऍग्री डिलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. सौ. निलिमा भोसले, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक राजदत्त, कोल्हापूरचे विभागीय कृषी सह संचालक दशरथ तांबाळे, जिल्हा कृषी अधिक्षक सुनील बोरकर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विनायक पवार, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, युवा उद्योजक ऋतुराज चव्हाण, डॉ. सौ. सुरभि भोसले-चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.शेखर गायकवाड पुढे म्हणाले, किसन वीरचा परिसर व विविध प्रकल्प पाहिल्यानंतर आगामी काळात राज्यातील इतर कारखान्यांनी आदर्श घ्यावा व येथील शेतकरी हिताचे प्रकल्पांची सर्व कारखान्यांनी राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रास्ताविकात मदन भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षात चोवीस हजार फळ झाडांची लागवड करण्यात आलेली असून अखंड नामयज्ञ सोहळ्याच्यानिमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनातून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाने भरघोस कृषी उत्पन्न घेण्यास ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे सांगितले.प्रारंभी सकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कोल्हापुर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. सौ. निलिमा भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक सुनील बोरकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, कृषी उपसंचालक विजय राऊत, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषतज्ञ रासकर, शेतकरी, वारकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते अवघ्या दहा मिनिटात “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे…’ या जगद्‌गुरू तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात कार्यस्थळावरील को जन परिसरात आंब्याच्या एक हजार रोपांची लागवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)