शेतमाल प्रक्रिया, उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेला प्रस्ताव पाठवणार

आदर्शकुमार ः नारायणगाव उपबाजारात जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

नारायणगाव-महिला बचत गटांच्या मार्फत शेतीमालाशी संबंधीत प्रक्रिया व उपक्रम राबविण्यासाठी जागतिक बॅंकेकडे प्रस्ताव पाठविण्याचा मानस जागतिक बॅंकेचे अधिकारी आदर्शकुमार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य ऍग्री बिझनेस व रूरल इन्फर्मेशन प्रोजेक्‍ट यांच्यासह जागतिक बॅंकेचे अधिकारी यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्राला आज (दि. 6) भेट दिली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जागतिक बॅंकेचे अधिकारी अनुपम जोशी, फणसाळकर, राज्याचे प्रकल्प संचालक अनिल बनसोडे, आत्माचे उपसंचालक ए. एस. मुळे यांनी भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, पणन विभागाचे उप सरव्यवस्थापक सूर्यवंशी, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक ऍड. एन. एम. काळे, सहायक निबंधक यशवंती मेश्राम, आंबेगावचे सहायक निबंधक पांडुरंग रोकडे, बाजार समितीचे सदस्य नासिर मणियार, रंगनाथ घोलप, हिराताई चव्हाण, सुरेखा गांजाळे, संतोष तांबे, सचिव चेतन रूकारी, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. बाजार समिती तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच योगेश पाटे व उपसरपंच संतोष दांगट जागतिक बॅंकेच्या अधिकारी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शेती उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया तसेच शेतीमाल निर्यात होण्यासाठी जागतिक बॅंक व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी, बाजार समिती, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. अशी माहिती आदर्शकुमार यांनी माहिती दिली. तसेच उत्पादक संस्था यांना विकासात्मक कामे करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, शेतीमालावर आधारीत प्रक्रिया, शेतीमालाशी इतर उपक्रम तसेच निर्यातीसाठी प्रोत्साहन आदी विषयांची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी आत्माचे डायरेक्‍टर मुळे म्हणाले, शेतमालाची थेट विक्री व्हावी, चांगल्या मालाला बाजारभाव उपलब्ध व्हावे, शेतीमालावर प्रोसेसिंग, निर्यात याबाबत मार्गदर्शन करण्याचा तसेच जागतिक बॅंकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यावेळी जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी रूरल ट्रान्फोरशन प्रोजेक्‍ट (एसएमएआरटी) हा प्रकल्प संपला असल्याने नव्याने निधी उपलब्ध होणार नाही; मात्र शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या मागणीनुसार जागतिक बॅंकेकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रकल्प व गरजा याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

  • जागतिक बॅंकेकडून अपेक्षा
    बाजार समितीचे संचालक ऍड. एन. एम. काळे यांनी जुन्नर तालुक्‍यात टोमॅटो, कांदा उत्पादनाबाबतची माहिती देऊन कोल्ड स्टोरेज, शेती मालावर प्रक्रिया यासाठी जागतिक बॅंकेने बाजार समित्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केली. संचालिका हिराताई चव्हाण यांनी ग्रामीण भागात भरपूर बचत गट आहेत. या बचत गटांना शेतीमाल प्रक्रिया राबविण्यासाठी जागतिक बॅंकेने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी केली. सरपंच योगेश पाटे यांनी जुन्नर तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेज उभारावेत अशी मागणी केली. यावेळी शिवतेज फार्मरचे स्वप्नील ढवळे, सारंग घोलप यांनी कृषी उत्पादनाला कर्ज उपलब्ध होत नाही. टेस्टींग रिपोर्ट नसल्याने कर्ज अथवा अनुदान मिळत नाही. ग्रुप शेतीला शासनाने व जागतिक बॅंकेने प्राधान्य द्यावे. एक वर्षानंतर सबसिडी दिली जाते. आदी समस्या व्यक्त केल्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)