शेतमजूरांची भासतेय टंचाई

चिंबळी- कुरुळी-चिंबळी परिसरात गेल्या आठवड्यात पूर्वी खरीप हंगामातील वाल, मूग, उदीड इतर पिकांची काढणी करून शेतीची मशागत करून कांदा पिकाची लागवड सुरू केली आहे. मात्र, लागवडीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह शेतात राबत आहे. दरम्यान, कुरुळी, चिंबळी, निघोजे परिसरात छोट्या-मोठ्या प्रमाणात कंपन्या व गोदामे उभारली असल्याने या भागातील महिला वर्ग सुद्धा कंपनीमध्ये नोकरी व्यवसायासाठी जात असल्याने शेतीसाठी कामासाठी महिला मंजुराची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले. गेल्या आठवड्याभरापासून कुरुळी, चिंबळी परिसरात कांदा लागवड सुरू झाली असून कांदा लागवड करण्यासाठी महिला मजुरांना 300 रुपये मंजुरी देऊन कांदा लागवड केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)