शेतजमिनीत पत्नी सहहिस्सेदार

सातारा, जावळी तालुक्‍यात एकूण 129 कुटुंबांना दाखला

सातारा – सातारा जिल्ह्यातल्या सातारा आणि जावळी या दोन तालुक्‍यांत अनुक्रमे 88 आणि 41 अशा एकूण 129 कुटुंबांत पतीच्या सहमतीने सातबारावर नावं चढवून शेतजमिनीत सहहिस्सेदार असल्याचा दाखला देण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते या शेतकरी कुटुंबांना पत्नीच्या नावासह नव्या नोंदणीच्या सातबारा उताऱ्याचं वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे संपूर्ण सातारा जिल्हयात स्वागत होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्याच्या माहेरवाशिण असलेल्या सावित्रीबाईंची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. पाच हजार वर्षांच्या गुलामीला सुरूंग लावण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. सातारा तालुक्‍यातल्या गजवडी, अंगापूर, रेवंड, शेळकेवाडी आणि कारी तसंच जावळी तालुक्‍यातल्या ओझरे, म्हाते खुर्द, भिवडी या गावांमधल्या 129 दांपत्यांनी हे पुरोगामी पाऊल उचललं आहे. रेवंडे (ता. सातारा) येथे सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लागावं म्हणून पुरुषांनी संमतीपत्रे भरली.

कुटुंबातील कर्त्यापुरुषाच्या बरोबर शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पत्नीचंही सहहिस्सेदार म्हणून मालकी सदरी नाव असावं, अशी शेतकरी संघटनेची मागणी होती. या मागणीला धरून महाराष्ट्र सरकारनं 1992 मध्ये मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा दाखवणारी ‘लक्ष्मी मुक्ती’ ही योजना कुटुंबातील दोघांच्या सहमतीनं राबविण्याचा निर्णय घेतला. तसं परिपत्रक निघालं. मात्र, सरकारी कारभारातील उदासिनतेमुळे ही योजना पुरेशा लोकांपर्यंत पोहचली नाही.

पुरुषाच्या सहमतीने सातबारावर नाव लागत असल्यानं आपल्या पश्‍चात पत्नीच्या नावे सगळं होणार आहे, मग घाई का असं म्हणून पुरुषांनी कधीच पत्नीचं नाव लावलं नाही. बहुतेक ठिकाणी ग्रामसभेत या विषयावर साधी चर्चा करायलाही काही मंडळींनी पुरुषी मानसिकतेतून विरोध केला. आपल्या हयातीत पत्नीचं नाव जमिनीवर लागल्यास उद्या तिनंच आपल्याला बेदखल केलं तर, अशी अनाठायी भीती दिसून आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)