शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नाही: खा. राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढा कॅन्सरशी या परिसंवादाला उस्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका हा कॅन्सरग्रस्थांचा तालुका म्हणून ओळखला जाणार आहे. कारण शिरोळचं पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याच अहवालात म्हटलं आहे. या दूषित पाण्यामुळं शिरोळ तालुक्यात पिकणारा भाजीपाला खाल्ल्यामुळं कँसर सारखे आजार उद्धभवत असल्याचा पुनरुच्चार आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढा कॅन्सरशी या परिसंवादात करण्यात आला आहे. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रायचूर विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्फत शिरोळ तालुक्याचा अहवाल आज या परिसंवादात सादर करण्यात आला. दरम्यान नेमकं कशामुळं हा कॅन्सर वाढीस लागतो आहे? याच मूळ कारण शेधण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामुळं नुसतं शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नसल्याचं देखील खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापुरातल्या शाहू स्मारकात लढा कॅन्सरशी या परिसंवादाच आयोजन करण्यात आलं होत. या परिसंवादत रायचूर कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रायचूर विद्यापीठातील तज्ञाच्या सहकार्याने गेल्या तीन महिन्या पासून शिरोळ तालुक्यातील पाणी, माती आणि भाजीपाला यांचे विविध ठिकाणचे ३७ नमुने घेऊन त्यांच्या प्रयोगशाळेत चाचणी केली असता हे पाणी पूर्णतः दूषित असून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचा प्रथमिक अहवाल आज सादर करण्यात आला आहे. हा भाजीपाला खाल्ला तर कँसर सारखे गंभीर आजार होण्याची चे शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या मध्ये कॅन्सर वाढीला पोत्साहन देणारे सर्वाधिक घटक आढळल्याचं रायचूर विद्यापीठाचे कॅन्सर संशोधक डॉ . एम. भीमाण्णा आणि डॉ. आशुतोष पाटील यांनी म्हटलं आहे.

शिरोळ तालुक्यातील दूषित पाण्यावर पिकणाऱ्या भाजी पाल्यामुळं सामान्य जनतेला रोगराई होऊ नये तसंच दोष नेमका कशात आहे. हे शोधण्यासाठी गेली ३ महिने तज्ज्ञांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते हि शिरोळ तालुक्यात फिरत आहेत. प्राथमिक अहवाला नुसार यापुढे दूषित पाण्यावर शेती आणि भाजीपाला पिकवू नये यासाठी शेतकऱ्याच्यात जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात अली आहे. परंतु नेमकं कशामुळं हा कॅन्सर वाढीस लागतो आहे? याच मूळ कारण शेधण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून नुसतं शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येणार नसल्याचं देखील खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे

या परिसंवादात पंचगंगा नदी मध्ये जिल्यातील विविध साखर कारखान्याचे दूषित पाणी , शहरातील मैला कचरा आणि औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी थेट सोडण्यात येत असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. या संदर्भांत जिल्हा प्रशासन , प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करणं आणि शोध घेणं गरजेचं बनलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
88 :thumbsup:
2 :heart:
7 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)