#Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधेल,अशी शक्‍यता आहे. गोयल यांच्याकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प सरकारचा सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प ठरणार आहे. त्याचे स्वरूप अंतरिम अर्थसंकल्प किंवा लेखानुदान असे असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)