शेतकऱ्यांसाठी मोदींची हमी ; पिकांना देणार दीडपट हमीभाव

नवी दिल्ली: खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (किमान आधारभूत किंमत- MSP)  देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिली. इतकेच नाही तर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली जाईल, असे मोदींनी जाहीर केले.

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकातून आलेल्या 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय 2018-19 च्या ऊसाचा एफआरपीही येत्या दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव असेल, असेही मोदी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. त्यासाठीच सरकार प्रयत्न करत असल्याचं मोदींनी नमूद केले. गेल्या सात ते 10 दिवसात शेतकऱ्यांना 4 हजार कोटींची मदत दिल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना सिंचन-ठिबक सिंचन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि सौरपंप वापरण्याचे आवाहन केले. सौरपंपासांठी शेतात सोलर पॅनेल बसवा. या सर्व उपायांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मोदींनी उत्पादन वाढीवर भर दिलाच, शिवाय शेतकऱ्यांनी शेतजमिनीचा वापर पोषक तत्व आणि  अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून करण्याचा सल्ला दिला. शिवाय रासायनिक खतांचे प्रमाण घटवण्याचे आवाहन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून पिकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी देशभरात विविध आंदोलनंही झाली. महत्त्वाचं म्हणजे स्वामिनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ज्या शिफारसी केल्या आहेत, त्यापैकी महत्त्वाची शिफारसही दीडपट हमीभावाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)