शेतकऱ्यांसाठी मंचरला आज बैठक

संग्रहित छायाचित्र...

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा केंद्रांच्या कामकाजाविषयी चर्चा करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी मंचर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने या बैठकीचे आयोजन केले आहे. विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बी, बियान्यांची कच्ची पावती देणे, जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठेबाजी करणे, कालबाह्य औषधे व बनावट माल विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा ऊर्जा समितीचे प्रमुख नितीन मिंडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, तालुका ऊर्जा समितीचे प्रमुख सुभाष मावकर मार्गदर्शन करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)