शेतकऱ्यांवर अन्याय न करता पूर्ण करा निळवंडेचे काम

जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी : आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
नगर – जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील 182 गावांना वरदान ठरलेल्या निळवंडे कालव्यांची संपादित जमीन ही शासनाच्या नावावर आहे. शेतकऱ्यांना लवकर कसे पाणी मिळेल याचा विचार करवा, कोणत्याही अडचणीचा विचार न करता संबधित अधिकाऱ्यांनी शासकीय नियमात काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
निळवंडे कालव्यांच्या कामातील समस्या व येणाऱ्या अडचणीबाबत बुधवार दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची संयुक्‍त बैठक झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्यासह उपविभागीय अधिकारी संगमनेर, कार्यकारी अभियंते पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता उर्ध्व प्रवरा विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख, सहा. संचालक नगर रचना, उपकार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग संगमनेर स्वीय सहायक समन्वय शाखा, उपकार्यकारी अभियंता म.रा.वि.म.मडळ, उपकार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे उपविभाग अकोले, उपअधिक्षक भूमीअभिलेख अधिकारी अकोले आदी उपस्थित होते. त्याचबरोबर निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे यावेळी उपस्थित होते.
अकोले, संगमनेर, सिन्नर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर या सात विधानसभा मतदार संघातील 182 गावातील सुमारे सात ते आठ लाख लोकसंख्या निळवंडेचे पाणी शिवारात कधी येते? याकडे नजर लावून बसलेली आहे. 8.32 टीएमसी क्षमतेच्या निळवंडेमुळे सुमारे 67 हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. मात्र, धरणात पाणी अडविले जाऊन सुद्धा कालवेच नसल्याने निळवंडे लाभक्षेत्राचा शिवार दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे आणि घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करीत आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील 182 गावांना निळवंडे वरदान ठरणार आहे. जागा निश्‍चिती, पायाभरणीपासून आता कालव्यांसाठीचा सुमारे पाच दशकांचा संघर्ष निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांनी भोगला आहे.

* खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठकीचा आढावा घेताना म्हणाले, निळवंडे लाभक्षेत्रात दुष्काळी पट्टयातील 182 गावांचा समावेश आहे. या क्षेत्रातील लाभधारकांना न्याय मिळणे गरजेचे आहे. निळवंडेचे कालव्याचे भूसंपादनही पूर्ण झाले आहे. लाभधारकांना या कालव्यांचा लवकरात-लवकर लाभ व्हावा, यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बैठक आयोजित केली जाणार आहे.
– सदाशिव लोखंडे
खासदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)